HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे? – उदयनराजे भोसले

मुंबई | राज्यसभेच्या नव निर्वाचित खासदारांनी काल (२२ जुलै) दिल्लीत शपथ घेतली. त्यात उदयनराजे भोसले यांनी देखील काल शपथ घेतली. आज (२३ जुलै) उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केले. या दरम्यान, शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो शिवाजी महाराजांच्या वर का, असा सवाल भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

दिल्लीत काल (२२ जुलै) महाराजांच्या वंशजांचा अपमान झाला असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला आहे.संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत? संजय राऊतांना मी काहीही उत्तर देणार नाही, असे उदयनराजे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे?,असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाताला सलाईन, अंगात अशक्तपणा, तरीही धैर्यशील माने भर पावसात मराठा मोर्चाच्या अग्रस्थानी!

News Desk

१५ दिवसात आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होणारच!   

News Desk

गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा! – मुख्यमंत्री 

Aprna