HW News Marathi
महाराष्ट्र

उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबद्दलची चर्चा झाली. त्या बैठकीत साताऱ्यातील आमदार आणि नेत्यांनी उदयनराजे यांना आपला विरोध असल्याची भूमिका घेतली. यानंतर उदयनराजे आणि शरद पवार यांच्यातही चर्चा झाली.

मात्र उदयनराजे भोसले यांना शरद पवारांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळेच इतर पक्षातही आपले मित्र असल्याचं सूचक विधान उदयनराजेंनी पत्रकारांशी बोलताना केलं होतं. या पार्श्वभूमीवर उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी साताऱ्याहून रवाना झाले आहेत. त्यामुळे या भेटीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला आग

News Desk

मराठा आरक्षणासंबंधी दिल्लीच्या वकिलांशी अशोक चव्हाणांनी केली चर्चा

News Desk

बॉलिवुड ड्रग्स प्रकरण : अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबी कार्यालयात दाखल 

News Desk