HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होतंच आहे –  उदयनराजे भोसले

सातारा | ‘मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. गुणवत्ता असूनही अनेक मुले-मुली त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. या परिस्थितीमध्ये इतरांना ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे, ही मागणी आम्ही करत आहोत. या समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा त्यांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, तो सुटणे महत्त्वाचे आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. साताऱ्यात आज (२५ सप्टेंबर) शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी त्यांची भेट घेतली होती.

‘ज्या मराठा समाजाने राज्यासाठी, देशासाठी मोठे योगदान दिले. त्या समाजातील पुढची पिढी सध्या हतबल अवस्थेत आहे. गुणवत्ता असूनही शिक्षण आणि नोकरीमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने या समाजातील मुले-मुली चिंताग्रस्त आहेत. इतर समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, असे आम्ही म्हणत नाही तर इतर समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्याच पद्धतीने मराठा समाजही अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे. त्यांनादेखील आरक्षणाचा लाभ देऊन त्यांच्या भविष्याची चिंता मिटवावी, अशी आमची मागणी आहे. पुण्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत सविस्तर विचार मंथन होईल, मी या बैठकीला जाणार आहे. मराठा समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा समाजाचा प्रश्न गांभीर्याने सुटणे महत्त्वाचे आहे,’ असे उदयनराजे म्हणाले.

https://www.facebook.com/297806127025237/posts/1867410710064763/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्हाला अजून किती बलात्कार आणि विनयभंग पाहिजेत”, फडणवीस अजित पवारांवर भडकले  

News Desk

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा गेम प्लॅन तयार

News Desk

माजी मंत्री संजय राठोड पुन्हा आले चर्चेत..नेमकं काय झालं ?

News Desk