HW News Marathi
महाराष्ट्र

“उद्धव ठाकरेंनी धुक्यात भलत्याच व्यक्तीचा हात पकडला”- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | एका माध्यमाने भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेतली. या अराजकीय मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांची राजकारणाव्यतिरिक्त एक वेगळीच बाजू सर्वांना पाहायला मिळाली. यादरम्यान, मुलाखतीत मुनगंटीवारांना काही नेत्यांना एक गाणं डेडीकेट करायचं आणि त्यांचा एक चांगला गुण सांगून त्यांना सल्ला द्यायला सांगितला. त्यावर मुनगंटीवार यांनी भन्नाट उत्तरे दिली.

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्ये एकटे पडल्याची भावना

मुनगंटीवारांना सर्वात आधी पृथ्वीराज चव्हाणांबद्दल विचारले असता त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, ‘ पृथ्वीराज चव्हाण अतिशय प्रामाणीक आणि सयंमी नेते आहेत. तसेच, यावेळी मुनगंटीवारांनी चव्हाणांसाठी ‘आदमी मुसाफीर है, आता है जाता है…झोका हवा का पानी का घेरा…फिर वो अकेला रेह जाता है…’, हे गाणं म्हणत पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्ये एकटे पडल्याची भावना बोलून दाखवली. पुढे मुनगंटीवारांना अजित पवारांविषयी विचारण्यात आले असता, ते म्हणाले की अजित पवारांचा वक्तशिरपणा आणि स्पष्टवक्तेपणा सर्वात चांगला आहे. इतर नेत्यांना हेवा वाटेल असा त्यांचा हा गुण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच अजित पवारांमध्ये मीपणाची ऐट असल्याचे म्हणत, ‘आज जवानी(राजनिती)पर इतराने वाले कल तु पचतायेगा…चढता सूरज धिरे धिरे ढलता है, ढल जायेगा,’हे गाणं गायलं.

उद्धव ठाकरे एक सुसंस्कृत आणि पारिवारीक राजकारणी

पुढे मुनगंटीवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे एक सुसंस्कृत आणि पारिवारीक राजकारणी आहेत. पण, त्यांनी अचानक आमची साथ सोडली आणि धुक्यात भलत्याच व्यक्तीचा हात पकडला. आता त्यांना तो हात सोडताही येत नाही, असे म्हटले. तसेच, ‘भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना…पुष्प नही बन सकते तुम काटे मत बनना…’हे गाण डेडीकेट केलं.

यावेळी सर्वात शेवटी मुनगंटीवारांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचे आपले मत व्यक्त केले. फडणवीस हे अतिशय आक्रमक आणि अभ्यासू नेते असल्याचं ते म्हणाले. तसेच, ‘रूक जाना नही, तू कभी हार के, काटो पे चलके मिलेंगे साये बहार के…’, हे गाणं डेडीकेट केलं

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“….तर या विरोधात कोर्टात चॅलेंज करणार” – समीर वानखेडे

News Desk

“…भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये”, सामनातून काँग्रेसला सल्ला

Aprna

सहा भाविकांना विषबाधा, एकाचा मृत्यू

News Desk