HW News Marathi
महाराष्ट्र

“युती आणिआघाडीची चिंता करू नका, शिवसेना बळकट करा”; उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई | केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार काल (७ जुलै) पार पडला. ४३ नव्या मंत्र्यांनी शपथ घेऊन आपल्या पदाचा ताबा घेऊन कमला सुरुवात देखील केली आहे. केंद्रात कॅबिनेट विस्तार झाल्यानंतर राज्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्ष बळकट करणासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची आज बैठक पार पडली. खासदार अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला.

माझं गाव माझी जबाबदारी मोहीम राबवा

सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी माझं गाव माझी जबाबदारी हि नवीन मोहीम राबविण्यास सांगितलं आहे. तसेच जास्तीत जास्त गावांत पोहचा, लोकांशी संपर्क वाढवा. आपण ज्या योजना राबवतोय त्या लोकांपर्यंत पोहचतायेत की नाही याची खातरजमा करा. प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त जनतेची कामं करा. शिवसेना पक्ष ही आपली जबाबदारी आहे. १९६६ पासून आजपर्यंत आपण इथपर्यंत कसं आलोय ते जाणून घ्या, शिवसेनाप्रमुखांचा विचार घराघरात पोहचवण्याचं काम करा. निवडणुका येतील जातील. पण लोकांचा विश्वास संपादन करा असं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंनी केले असं अनिल देसाईंनी सांगितले.

१२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवणार

सेनाभवनात पार पडलेल्या या बैठकीनंतर खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा. माझं गाव कोरोनामुक्त गाव अशी मोहिम राबवा. गावागावांत शिवसंपर्क अभियान सुरू करा. जनतेची काम करा. पक्ष बळकट करा. विधानसभानिहाय, तालुकानिहाय, पंचायतनिहाय पूर्वतयारी आहे. १२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आॅक्सिजन अभावी जवानाचा मृत्यू

News Desk

महाराष्ट्रात ‘सीएए’ लागू होऊ देणार नाही ?, तुझ्या बापाचे राज्य आहे का?

swarit

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेना फोन, तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा दिला सल्ला

News Desk