HW News Marathi
महाराष्ट्र

‘अजून किती चौकशी करणार आहात’?, खडसेंचा सवाल; फडणविसांच उत्तर..!

नाशिक। शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या नंतर आता राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. तर गेल्या पाच तासांपासून ही चौकशी सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली आहे.

फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रवादीत आल्यानेच भाजपने सुडापोटी आपल्यावर कारवाई सुरू केल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्याकडे फडणवीस यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सुडाने काम करण्याची प्रथा नाही, असं देखील फडणवीस म्हणाले.

अजून किती वेळा चौकशी करणार आहात?,

ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?, असा सवाल खडसे यांनी केला

ईडीच्या चौकशीला जाण्या अगोदर एकनाथ खडसे यांनी भाजपवर थेट आरोप केला होता. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने सगळ होत असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकण ते विदर्भातील जिल्ह्यांना यलो ॲलर्टक …पावसाचं कमबॅक ?

News Desk

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर लागणार – सुधीर मुनगंटीवार

News Desk

१८-४४ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लसीकरण केले जाणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk