HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार, आशिष शेलारांसह उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत हे काल (११ नोव्हेंबर) लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. छतीत दुखू लागल्याने राऊत रुग्णालायता दाखल झाले. यानंतर राऊतांवर काल रात्री डॉक्टर अजित मेनन यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. तपासणीमध्ये राऊतांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये २ ब्लॉक होते. राऊत यांना अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात हलवण्यात आले असून, त्यांना उद्या (१३ नोव्हेंबर) सुटी मिळण्याची शक्यता आहे. सध्या राऊत यांचा लिखाण करतानाचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

राऊत यांच्या भेटीसाठी आज (१२ नोव्हेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांची भेट घेत त्यांची चौकशी केली आहे. थोड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लीलावती रुग्णालयात जावून भेट घेत त्यांच्या तब्यातीची विचारपूस केली आहे. तसेच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देखील राऊतांची भेटी घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

राऊतांनी “लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’ बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…”, असे ट्विट असे ट्विट शिवसेना राऊतांनी लिलावती रुग्णालयातून केले. राऊत गेल्या २० दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. रुग्णालयात असताना राऊत पत्रकार परिषदे घेणे जणून दिनक्रम झाला होता. मात्र, पत्रकार परिषद जरी नाही घेतली नसली तरी त्यांची राजकीय भूमिका मांडणार असल्याचे हे आज त्यांच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध ?, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

News Desk

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करुन देणार नाही | मराठा आंदोलक

News Desk