HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत सल्ला देण्याचा अधिकारच नाही !

मुंबई | “राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पंढरपूरला श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढीच्या महापूजेसाठी गेले होते. मग त्यांना राम मंदिराच्या भूमिपूजनावर बोलण्याचा अधिकारच काय ?”, असा सवाल उपस्थित करत भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “अयोध्या राम मंदिराच्या ई-भूमिपूजनाचा सल्ला देण्याचा  उद्धव ठाकरेंना काहीही अधिकार नाही”, असे म्हणत दानवेंनी मुख्यमंत्र्यांच्या राम मंदिराच्या ई-भूमिपूजनाच्या सल्ल्यावर निशाणा साधला आहे.

“उद्धव ठाकरेंनी जर विठ्ठलाची पूजा ऑनलाइन पद्धतीने केली असती तर सल्ला देण्याचा अधिकार असता. मात्र, स्वत: कोरोना काळात पंढरपूरला जाऊन महापूजा करायची आणि दुसऱ्यांना मात्र कोरोनाचे कारण देत ई-भूमिपूजनाचा सल्ला द्यायचा हा दुटप्पीपणा आहे”, असे दानवे म्हणाले. त्याचप्रमाणे, ‘महाराष्ट्र २ मुख्यमंत्री आहेत का ? शरद पवार राज्याचे शॅडो मुख्यमंत्री आहेत का ?’ असा प्रश्न दानवेंनी विचारण्यात आला. त्यावर “शरद पवार हे मुख्यमंत्री नव्हे तर महाविकास आघाडीचे कर्णधार आहेत”, विधान दानवेंनी केले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

“कोरोनाचे संकट असलं तरी मुख्यमंत्री म्हणून राम मंदिराच्या भूमिपूजनाला मी जाऊन येईलही. मुद्दा तो नाही. पण राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी इतक्या वर्षांपासून जे रामभक्त वाट पाहत आहेत. ज्यांची या सोहळ्याला उपस्थित राहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्यांच्यासाठी हा सर्वोच्च आनंदोत्सव आहे, त्या लाखो रामभक्तांचे काय करणार? त्यांच्या भावनेचे काय करणार?, देशात कोरोनामुळे मंदिरांमध्ये जाण्यास सर्वसामान्यांना बंदी घातलेली आहे. मग तुम्ही राम मंदिराचं ई-भूमिपूजन करू शकत नाहीत का?, असा परखड सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

Related posts

२०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपती बनविणार | संजय राऊत

News Desk

बालेकिल्ल्याला मिळाली फक्त दोन मंत्रिपदे….

News Desk

मी शिवसेना सोडली कारण….!

News Desk