HW News Marathi
महाराष्ट्र

निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात १० हजारांची वाढ, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई | ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक काल (१४ ऑक्टोबर) पार पडली आहे. या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात १० हजारांची वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस सरकारमधल्या जलयुक्त शिवारच्या चौकशीचाही निर्णय याच बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आणखी काय काय निर्णय घेण्यात आले?

नव्याने निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयासाठी निर्माण केलेल्या १२८ पदांना कायम ठेवण्याचा निर्णय

नागपूर शहर व परिसरातील रेल्वे मार्गावर आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित बी.जी.मेट्रो ट्रेन सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता

डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारुप मागे घेण्याचा निर्णय

कोविडमुळे सहकारी संस्थांतील महत्वाच्या विषयांच्या मंजुरीचे अधिकार संचालक मंडळाला दुरुस्ती करण्याचा निर्णय अधिनियमात सुधारणा

केंद्र शासन पुरस्कृत “अटल भूजल (अटल जल) योजना” राज्यात राबविण्यास मान्यता

मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या/अतिरिक्त शाखा यांना २० टक्के अनुदान देणे तसेच २० टक्के अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

Manasi Devkar

सगळ्यांनी वेगवेगळे लढून पाहू, पण २ दिवस आधी सेटलमेंट करायची नाही, चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आवाहन

News Desk

वांगणीत घरफोडी, २ लाखांचा ऐवज लंपास

News Desk