मुंबई | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून अखेर आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. आता या निर्णयामुळे व्यापारी वर्गात काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही किराणा दुकानात जाण्याच्या कारणाने लोकं घराबाहेर पडत असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, नव्या नियमांनुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री ८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही ७ ते ११ ची मर्यादा घालून देण्यात आली आहे. हे नियम आज (२० एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून लागू होणार असून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
काय असणार नवे नियम?
किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी ७ ते ११ याच वेळेत खुली राहणार.
नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहणार आहेत.
All groceries, vegetable shops, fruit vendors, dairies, bakeries, confectionaries, all type of food shops, shops related to farm produce, pet food shops, shops related to materials for impending rainy season for individuals/orgs to be open only b/w 7 to 11 AM: Maharashtra Govt pic.twitter.com/N14KZl4Rmk
— ANI (@ANI) April 20, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.