HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधीला आज एक वर्ष पूर्ण!

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी आजच्याच दिवशी एक वर्षापूर्वी (२८ नोव्हेंबर २०१९ ) ला शपथ घेतली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. उद्धव ठाकरेंनी आज (२८ नोव्हेंबर) शिवतीर्थावर हजारो लोकांच्या साक्षीने शपथ घेतली होती. राज्यात पहिल्यांदाच महाविकासआघाडीच्या नावाने नवे समीकरण राज्याला पाहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घरातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत शपथ घेतली होती. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते उद्धव ठाकरे यांचे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब आले होते. यावेळी राज ठाकरे यांच्या मातोश्री यांना अश्रू अनावर झाले होते.

अशी घेतली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ

“छत्रपती शिवजी महाराजांना वंदन करून, आणि माझ्या आई-वडीलांना स्मरण करून, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल श्रद्धा व खरी निष्ठा बाळगीन, मी भारताची. सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन, मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही घरं सोडू नका, मी वरिष्ठांशी बोलतो”, राज ठाकरेंनी दिले पोलीसांच्या पत्नींना आश्वासन

News Desk

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

शिवसेनेकडून मोफत पेट्रोल अन् पेट्रोल पंप निघाला भाजपच्या कार्यकर्त्यांचा

News Desk