HW News Marathi
महाराष्ट्र

SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई | मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.9 सप्टेंबरला नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे.

9 सप्टेंबर पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आले नाहीत, अशा SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असतील, असं शासन आदेशात ठाकरे सरकारने सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं एसईबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या कार्यवाहीबाबत महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला कायदेशीर अभिप्राय विचारात घेतल्यानंतर सर्व प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ही ठाकरे सरकारनं स्पष्ट केले आहे. तसेच हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहील, असंही सरकारनं सांगितलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

News Desk

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर 2 आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Aprna

कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला

News Desk