HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या शुभेच्छांनंतर मुख्यमंत्र्यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई | मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसाच्या हिरक महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व स्तरांतून, अनेक नेत्यांकडून, नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवत उद्धव ठाकरे यांना खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील काळात देशाच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान असावे यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील याचा पुर्ण विश्वास वाटतो”, असे ट्विट करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय लिहिले आहे पत्रात?

या पत्रात मोदींनी, ‘ वाढदिवसानिमित्त आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना’, असे पत्रात पंतप्रधानांनी लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत या शुभेच्छांचे आभार मानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक

News Desk

“सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है”, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्ला

News Desk

महसूल व ग्रामविकास विभागाने नागरिकांच्या सेवा सुविधासाठी प्राधान्य द्यावे! – अब्दुल सत्तार

Aprna