HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण ‘मुख्यमंत्री’ हा उल्लेख टाळला !

मुंबई| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.पंतप्रधान मोदींपासून ते देवेंद्र फडणवीस सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देताना मात्र उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख टाळल्याचे ट्विटमध्ये दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना म्हटले आहे, मा. उद्धवजी,आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, या शुभकामना!

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे.

त्यामुळे फडणवीसांवर सध्या सोशल मिडीयावर टिकेची झोड उठली आहे. फडणवीस जे दुसऱ्यांदा राज्याचे  मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक होते त्यांचे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंच्या पारड्यात पडले आणि फडणवीसांची संधी हुकली.त्यामुळे फडणवीसांनी मुद्दाम उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री उल्लेख टाळला आहे असा आरोप नेटिझन्स त्यांच्यावर करत आहेत.

Related posts

शिवेंद्रराजे भोसले यांचे मन वळवण्यासाठी शरद पवारांची मध्यस्थी

News Desk

अखेर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk

….अन् डॉक्टरांशी बोलता बोलता पंतप्रधान मोदी रडले

News Desk