HW News Marathi
Covid-19

“मला व्हिलन ठरवलं तरी मी काम करत राहणारचं”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुंबई | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (२ एप्रिल) राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. ते म्हणाले की, “बंगाल, आसाम अशा आणखी काही राज्यात निवडणूका आहेत तिथे कोरोना वाढत नाही का? तर मी त्यांना सांगू इच्छितो की मला तिथे काय सुरू आहे त्याबद्दल बोलायचं नाही

“मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे. मला माझ्या जनतेची काळजी आहे. त्यामुळे मला तुम्ही सगळ्यांनी व्हिलन ठरवलं तरी मी काम करत राहणार”.पुढे ते असं देखील म्हणाले की, “लसीकरण वाढवा असं म्हणत आहात पण मी सगळ्यांना (विरोधकांना) सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे जिथे लसीकरण मोठया प्रमाणात आणि वेगाने होत आहे. पण लसीचा पुरवठा आणखी व्हायला हवा”, असं देखिल त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे –

* मला अन्य राज्यांबद्दल बोलायचं नाहीये. आम्ही कोरोनाची राज्यातील सत्य परिस्थिती समोर मांडत आहोत.

* राज्यातील एकही कोरोना रुग्ण लपवला नाही आणि लपवणारही नाही.

* RTPCR चाचण्या करण्यावर सरकारचा भर

* फिल्ड हॉस्पिटल उभारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य

* सध्या राज्यात कोरोना चाचण्यांसाठी ५०० पेक्षा जास्त लॅब्स

* राज्यात रुग्णवाढ झपाट्याने. आज कदाचित आकडा ४५ हजारांच्या पार असेल.

* परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या १५ ते २० दिवसांमध्ये राज्यात वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडेल

* राज्यात विलगीकरणाचे बेडस ६२% भरलेत

* आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस यांची संख्या कधी वाढवणार ?

* मुंबईतील रुग्णसंख्या दररोज साडेसात ते ८ हजारांनी रुग्ण वाढताहेत

* केंद्राने राज्याला कोरोना लसींचा पुरवठा वाढवायला हवी, आम्ही मागणी करत आहोत.

* लस घेतल्यानंतरही लोक कोरोनाबाधित होतायत. कारण, काळजी घेतली जात नाहीये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरातून बाहेर पडताना ओळखपत्र सोबत ठेवा – पोलिसांच्या नागरिकांना सूचना

News Desk

लहान मुलांसाठी मॉडर्ना कंपनी लवकरच 50 मायक्रोग्राम मात्रेच्या लसींची करणार निर्मिती

News Desk

सोनिया गांधींनी २२ मे रोजी बोलावली सर्व विरोधी पक्षांची बैठक

News Desk