HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका, तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू, मातोश्रीवरून आदेश 

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतच्या पाली हिलमधील कार्यालयावर मुंबई महापालिकेनं कारवाई केली आहे. काल (८ सप्टेंबर) मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाबाहेर नोटीस लावली होती. कार्यालयात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. नोटिशीत दिलेली २४ तासांची मुदत संपल्यानंतर पालिकेनं आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली. यानंतर हिमाचल प्रदेशातून मुंबईकडे निघालेल्या कंगनानं शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.

कंगना थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरून पक्ष प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.कंगना आणि तिच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवर कुठेही बोलू नका, असे आदेश शिवसेना नेतृत्त्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. ‘कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका. तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. कंगनाच्या ट्विटवर, विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. त्यावर कोणतंही विधानं करू नका,’ अशा सूचना मातोश्रीवरून देण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांदिवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांसाठी विकासक निवड प्रक्रियेत गैरप्रकार

Aprna

  “आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं”, अजित पवारांचा भाजपला उपहासात्मक टोला 

News Desk

संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल, राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चेची शक्यता

Aprna