HW News Marathi
महाराष्ट्र

“हम करे सो कायदा”, अशीच फडणवीसांची प्रवृत्ती, खडसेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल

जळगाव | राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच मुक्ताईनगरात आले असून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. गावात येताच खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. माझा भाजपला विरोध नव्हता. भाजपमधील वाईट प्रवृत्तींविरोधात मी लढा दिला. एका व्यक्तिमुळे आपलं नुकसान झालं असं सांगतानाच फडणवीस यांची प्रवृत्ती हम करे सो कायदा अशीच असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच जळगावात आले. त्यानंतर आज ते पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांच्यासह मुक्ताईनगरात पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच नाथाभाऊ जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. त्यानंतर नाथाभाऊंना गुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच रिघ लागली. या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करत करत खडसे यांनी त्यांच्या घराकडे मार्गक्रमण केलं.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपने माझ्यावर अन्याय केला. मी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी ही कार्यकर्त्यांची भावना होती. मी भाजपला सोडल्यानंतर त्यांना आनंद झाला. त्याचाच उत्सव आज दिसत आहे. आज खऱ्या अर्थाने माझं सीमोल्लंघन झालं आहे, असं सांगतानाच माझा भाजपला विरोध नाही. भाजपमधील वाईट प्रवृत्तीविरोधात मी लढा दिला, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काकांच्या पावलावर रोहीत पवारांचे पाऊल, ४ वाजताच APMC पोहोचले मार्केटमध्ये

News Desk

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का? भाजपचा सेनेला सवाल 

News Desk

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस; एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्नेंची माहिती

Aprna