HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्यात पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक सुरु, लॉकडाऊनवर चर्चा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज (३० मे) पुन्हा बैठक सुरू आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये वर्षा बंगल्यावर सुरु आहे. या बैठकीत केंद्र सरकारकडून पाचव्या लॉकडाऊनची घोषण केली असून हा लॉकडाऊन हा ३० जूनपर्यंत वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनमधील शिथिलता यावर या बैठकीत चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. यानंतर आता राज्यातही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे.

या आठवड्यातली मुख्यमंत्री आणि पवार यांच्यातली ही दुसरी भेट आहे. याआधी शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला होती. यावेळी देखील दोघांच्या भेटीवर तर्कवितर्क काढण्यात आले होते.

सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोना आज २ हजार ९४० रुग्णांची  नोंद झाली आहे. तर आज  ९९ रुग्णांचा मृत्यू झाला, पण ८१ मृत्यू हे मुंबई महानगर प्रदेशातील आहे, यामुळे राज्यात चिंतेचीबाब आहे. त्यातील आहे. त्यामुळे  आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६५ हजार १६८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

 

Related posts

कर्नाटकातील भाजपचे नेते जनार्दन रेड्डी यांना अटक

News Desk

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात – डॉ. वीरेंद्र तावडेला जामीन

News Desk

योगी आदित्यनाथ आज पालघरमध्ये

News Desk