HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील जनतेची जबाबदारी माझ्यावर हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही – मुख्यमंत्री

मुंबई | महाराष्ट्राने काही करायचं ठरवलं की, महाराष्ट्र केल्याशिवाय राहत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला कोरोनाबरोबर करायची आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल (२२ नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळेस ते बोलत होते.

संयुक्त महाराष्ट्रात चळवळीत हुतात्म्यांनी संघर्ष केला नसता, तर आपल्याला राजधानी मिळाली नसती. तो एक संघर्ष होता. त्या संघर्षाचं वेगळ महत्वं होतं. चार दिवसांनंतर २६ नोव्हेंबर येत आहे. तो एक वेगळा लढा होता. मुंबईत घुसलेल्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा मुकाबला आपल्या बहाद्दर पोलिसांनी, एनएसजीच्या जवानांनी केला. त्या अतिरेक्यांना आपल्या पोलिसांनी आणि जवानांनी तिथल्या तिथे ठेचून टाकलं.

एकूणच आपण जेव्हा जेव्हा असा लढा देत आलो आहोत, त्या लढ्यात यश मिळवत आलो आहोत. आपल्यात असलेल्या जिद्दीमुळे आपल्याला यश मिळालं आहे. महाराष्ट्राने करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला या कोरोनाविरुद्ध करायची आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही निशाणा लगावला. राज्यात विरोधकांकडून मंदिरं उघडण्यासाठी तीव्र आंदोलनं करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. राज्यातील जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोल लगावला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”, भाजप पक्षाकडून ठाकरे सरकारवर हल्ला

News Desk

मनसेचे मुंबई, पुण्यातील २ मेळावे अचानक रद्द; कारण काय?

News Desk

जिल्हा प्रशासन, पोलिसांनी आता अधिक सतर्क राहून लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करावे !

News Desk