HW News Marathi
Covid-19

‘धार्मिक आणि राजकीय गर्दीसाठी टाळण्यासाठी एकच धोरण ठेवा’, मुख्यमंत्र्यांची मोदींना विनंती

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१६ जुलै) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कॉन्फेरेंस कॉल वरून संवाद साधला. या संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींना एक विनंती केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी, केंद्र सरकारनेच आता त्यांच्या स्तरावरून देशपातळीवर व्यापक धोरण आणावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

काय म्हणाले मोदी?

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्रयंशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी वाढत्या कोरोना रुग्णांचा आढावा घेतला आणि मुख्यमंत्र्यांना सल्लाही दिला. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, कर्नाटक बी. एस. येडियुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक

गेल्या आठवड्याभरात 80 टक्के केसेस आजच्या बैठकीत सामिल झालेल्या सहा मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील आहेत. महाराष्ट्र आणि केरळातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेस्ट, ट्रॅकिंग आणि लसीकरणावर भर दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार | अमित देशमुख

News Desk

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो कि … ! वाझेंच्या आरोपांवर अनिल परबांचे स्पष्टीकरण

News Desk

‘मन की बात’ आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, मनसेचा टोला

News Desk