HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यानी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (८ एप्रिल) कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झाले होते.

११ मार्चला उद्धव यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर बरोबर २८ दिवसांनी त्यांनी आज लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच पुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची बाधा झाली आहे. आदित्य हे होम क्वारंटाइन असून रश्मी ठाकरेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ‘लसीबद्दल मनामध्ये भिती आणि संभ्रम ठेऊ नका. मनात कोणतीही शंका न ठेवता लस टोचून घ्या,’ असं आवाहन उद्धव यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केलं होतं.

मोदींनीही आजच घेतला दुसरा डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले होते. मोदींनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी १ मार्चला मोदींनी लसीचा पहिला डोस घेतला होता. मोदीनी घेतलेल्या दोन डोसदरम्यान ३७ दिवसांचं अंतर आहे. लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नसतानाच मोदींनी लस घेतल्याने लसीकरणाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झालेली पहायला मिळाली होती. करोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचं यावेळी मोदी म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग पंतप्रधानही अयोध्येचा कार्यक्रम दिल्लीतून प्रतिकात्मक का करत नाहीत ?

News Desk

विद्यार्थ्यांच्या दहावीचा निकाल उशीरा लागण्याची शक्यता

News Desk

रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

News Desk