HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आज पक्ष प्रमुख म्हणून विरोधकांना सडेतोड उत्तर देतील –  अरविंद सावंत

मुंबई | शिवसेनेसाठी महत्वाचा असणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य सावरकर स्मारकात होणार आहे. दरवर्षी शिवतीर्थावर होणारा हा मेळावा सावरकर स्मारकात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच हा पहिलाच मेळावा असणार आहे. महाराष्ट्र, महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरे त्यांचे काम करत राहिले आज मात्र पक्षप्रमुख म्हणून ते राजकीय भाष्य करतील आणि विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देतील, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत.

शिवसैनिकासांठी दसरा मेळावा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचांरांचे धन घेण्याचा सोहळा असायचा. शिवसैनिक मेळाव्यातून बाळासाहेबांचे विचारधन आणि उर्जा घेऊन निघायचे. दसरा मेळाव्यातून देशाला दिशा देणारा विचार मिळत असे. राष्ट्रीयत्व, राष्ट्रधर्म यावर शिवसैनिकांना मार्गदर्शन व्हायचं, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व आहे. कारण ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आहेत. शिवाजी पार्क मधील दसरा मेळाव्यात वेगळी मजा आणि ऊर्जा असते पण यंदा कोरोनाची स्थिती पाहता हे शक्य नाही. मुख्यमंत्री स्वतः कोरोना बाबत नियम करत आहेत. मग ते स्वतः कसे मोडणार त्यामुळे सावरकर स्मारकात यंदा दसरा मेळावा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान सुरू केले आहे. त्यामुळे ५० लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ६.३० वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील आणि यांतर ठीक ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातून त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याला संबोधित करतील. तसेच, शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख नेते असे एकूण ५० जण उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊतांचा गौप्यस्फोट! नवनीत राणांनी दाऊदशी संबंधित ‘या’ व्यक्तीकडून घेतले ८० लाखाचे कर्ज

Aprna

स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याच पहायचं वाकून हे वडेट्टीवारांनी सोडून द्यावं’, नितेश राणे यांची टीका!

News Desk

‘पुण्यात अंगणवाडी सेविकांचे मोबाईल परत आंदोलन’, तत्कालीन मंत्री पंकजा मुंडेंच्या चौकशीची मागणी!

News Desk