HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री पुण्यात येणार नाहीत!

पुणे | कोरोना लशीची निर्मिती करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत. राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान एखाद्या राज्यात गेल्यास तेथील मुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी येतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, अशी माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली आहे.

देशात कोरोनाची साथ आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका असूनही राज्यातील महत्त्वाचे नेते त्यांच्या स्वागतासाठी पुण्यात जातील, अशी शक्यता होती. मात्र, आता पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनंतर ही शक्यता कमी झाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यातही काहीसा बदल झाला आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी दुपारी एक वाजता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येणार होते. मात्र, आता मोदी हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा

swarit

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध, प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट

News Desk

पुन्हा मातोश्रीची चिंता वाढली ! तेजस ठाकरेंच्या २ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण 

News Desk