HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर !

चिपळूण। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणला पूर्वपरिस्थितीची पाहणी करत आहेत. तिथल्या पुराचं आढावा घेत त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद देखील साधला आहे. केवळ चिपळूनच नाही तर पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका बसला आहे, तिथे ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात उद्या ते पाहणी करायला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, वाई अश्या अनेक ठिकाणी दर्दी कोसळून लोकांचं नुकसान झालं आहे.

पाहणी करून मदत करणार

चिपळूणमध्ये आज(२५ जुलै) परिस्थितीची पाहणी करून झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेऊन राज्य सरकार हवी ती मदत करणार असल्याचं सांगितलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या त्या ठिकाणी भेट देणार आहेत उद्या दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र त्यांचा दौरा असणार आहे तर प्रत्येक ठिकाणी तात्काळ मदत केली जाईल असं दुर्घटनाग्रस्त नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले तर लोकांना बरं वाटेल म्हणून मी मदतीची घोषणा करणार नाही, कोणालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांचा अंदाज घेऊनच सरकार मदत करेल आणि आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहोत असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

अजित पवार उद्या साताऱ्यासाठी रवाना

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या(२६ जुलै) पश्चिम महाराष्ट्रात पुराची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला देखील पावसाचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज(२५ जुलै) चिपळूणला पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अद्यापही पुराचं पाणी ओसरलं नसल्याने तिथे अजूनही पूर परिस्थिती कायम आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्या आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. एकीकडे जिथे कोकणात पावसाचा फटका बसला आहे, तिथे दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा फटका बसला अजून दर्दी कोसळून लोकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री कोकणात गेले असून उपमुख्यंमत्री पश्चिम महाराष्ट्रात पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. साताऱ्यात अनेक ठिकाणी दर्दी कोसळून लोकांचा जीव गेला असून त्यांना हवी ती मदत करू असं ही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसाद लाड यांचे पोलिसांविरुद्ध उपोषण

swarit

ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचं निधन

News Desk

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

Manasi Devkar