HW News Marathi
महाराष्ट्र

उल्हास बापट यांनी केलं अजित पवारांच्या वक्तव्याचं खंडण, १२ आमदारांबद्दल स्पष्टोक्ती !

पुणे। महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांच्या लवकर निर्णय घेतो असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आणि या विषयाला अनुशंगून उल्हास बापट यांची एच डब्ल्यू मराठी ने मुलाखत घेतली आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न निकाली लावण्यासंदर्भात त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले आहेत.

राज्यघटणेनुसार असं काही नसतं

कालपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा विषय चांगलाच चर्चीला गेला होता ज्यात दोन महत्वाची नावं वगळ्याचं बोललं जात होतं.त्यात सगळ्यात पहिलं महत्वाचं नाव म्हणजे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि दुस-या क्रमांकांचं नाव म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं. या कथीत बातम्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली पहायला मिळाली. या सगळ्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार अस्पष्टरित्या बोलले की, जे सदस्य निवडनुकीमध्ये पराभूत झालेत त्यांची नियुक्ती होत नाही. तर, या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी उल्हास बापट यांना यामागचं तथ्य वितारंलं असता त्यांनी उत्तर दिलंय- “राज्यघटणेनुसार असं काही नसतं. याउलट ज्ये निवडनुकीला उभे राहू शकत नाहीत कींवा राहिले तर पडतील त्यांना आधी संधी दिली जाते. माझं स्वत:चं असं मत आहे की राज्यपालच काय किंवा खासदार, आमदार काय यांनी राज्यघटणेकरता एक संक्षिप्त आढावा अभ्यास करावा.”

लोकसभेत पराभूत झालेत आणि त्यांनी मागच्या दाराने राज्यसभेत घेतलंय

पुढे त्यांना एक उदाहरण म्हणून असं कोणी आहे का ज्यांना निवडून आलेलं असतानादेखील विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून दिलं गेलंय असं विचारलं असता त्याचं स्पष्टीकरणदेखील त्यांनी सविस्तर दिलंय- “कसं असतं…हा राजकारणाचा विषय आहे आणि मी राजकारणानर बोलत नाही. फक्त राज्यघटनेवर बोलतो. परंतू अशी किती उदाहरणं आहेत जे, लोकसभेत पराभूत झालेत आणि त्यांनी मागच्या दाराने राज्यसभेत घेतलंय. तुम्ही शोधायला गेलात तर तुम्हाला १०० उदाहरणं मिळतील.”

त्यामुळे सध्यातरी यातून एकच निश्कर्ष निघतो की, ज्या आमदारांची निवड राज्यपालांकडून करण्यात योत नाही आहे त्यासाठी त्यांनी निवडून न येण्याचं कारण योग्य नाही. त्यामुळे कुठेतरी त्यांना या संदर्भात उडवाउडवीची च उत्तरं मिळतील अशी चिन्ह समोर दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या भारत बंदला राहुल गांधींचा पाठिंबा; भाजपवर डागलं टीकास्त्र

News Desk

नारायण राणेंचा कोकणात डंका,’या’ निवडणुकीत महाविकासआघाडीला दिला धक्का!

News Desk

आम्ही पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त करत त्यांना पिंगा घालायला लावला !

News Desk