HW News Marathi
महाराष्ट्र

उल्हासनगर मनपामध्ये नोकरी घोटाळा बोगस कागदपत्रांद्वारे केली भरती

उल्हासनगर उल्हासनगर महानगरपालिकेतील एका मृत कर्मचाऱ्याने 4 तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या व कागदपत्रांचा वापर केला असून चेकने लाखो रुपये स्वीकारल्याचे दिसले आहे .
उल्हासनगर महानगरपालिकेतील मागासवर्गीय भरती घोटाळ्यानंतर आणखी एक घोटाळा समोर आला आहे . 2017 मध्ये मनपातील अमित नावाच्या मृत कर्मचाऱ्याने चार तरुणांना महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले . अमितने हे पैसे स्वतःच्या नावाने असलेल्या ऍक्सिस बँक अकाऊंट मध्ये स्वीकारल्याच्या नोंदी आहेत . अमितने या चार तरुणांना मनपा आयुक्त, उपायुक्त, यांच्या स्वाक्षरीचे बनावट कार्यालयीन आदेश , वैद्यकीय तपासणीचे पत्र तरुणांना दिले गेले .एवढेच नव्हे तर या कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून हजेरीपत्रकात देखील त्यांची हजेरी डिसेंबर 2017 मध्ये नोंदवली असल्याचे बनावट कागदपत्रे बनविले गेली .
शिवसेना शहरप्रमुख आणि नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे .
या संदर्भात मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मनपाने कोणत्याही प्रकारची नोकर भरती केलेली नाही , अशा प्रकारची भरती करण्यापूर्वी जाहिरात केली जाते . अशी जाहिरात दिली गेलेली नाही . ज्या तरुणांची फसवणूक झाली आहे त्यांनी समोर यावे आणि पोलीस ठाण्यात तक्रार करावी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील! – मुख्यमंत्री

Aprna

माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणात जामीनावर सुटलेल्या ६ जणांना पुन्हा अटक

News Desk

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध – छगन भुजबळ

News Desk