मुंबई | राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुरुवातीपासूनच अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्य सरकार या आव्हानाचा सामना करत असतानाच आता केंद्राकडूनही राज्यातील या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यातील कोरोनास्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्हे कोरोनाबाधित आहेत. तर राज्यातील कोरोनाबाधितांचा आणि मृत्यूचा आकडाही चिंता वाढवणारा आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांची अवस्था बिकट आहे”, अशा शब्दांत डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे.
#IndiaFightsCorona:@drharshvardhan, along with Sh @AshwiniKChoubey, reviews status, preparedness and actions taken by #Maharashtra Govt for #COVID19 response.@PMOIndia @rajeshtope11#CoronaOutbreak #HealthForAll #SwasthaBharat #Lockdown3 pic.twitter.com/HodbABLoHH
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) May 6, 2020
“महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्हे कोरोनाबाधित आहेत. त्यांपैकी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांची अवस्था अधिक गंभीर आहे. एकीकडे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १४, ५४१ पार, कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५८३ वर पोहोचला आहे. या आकडेवारीमुळे चिंता वाढली आहे. मात्र, आतापर्यंत गडचिरोली आणि वर्ध्यात एकही कोरोनाबाधित नाही हे दिलासादायक आहे”, असे डॉ. हर्षवर्धन यावेळी म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सध्या राज्यांचा आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या उपाययोजना, सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, राज्य सरकारला पाठिंबा देत त्यांच्या अडचणी सोडवण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचे यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
“गडचिरोली आणि वर्ध्यात एकही कोरोनाबाधित नाही. तर गेल्या २८ दिवसांपासून गोंदिया आणि उस्मानाबाद जिल्ह्यात एकही नवा कोरोनाबाधित नाही. अहमदनगर व भंडारा जिल्ह्यातही गेल्या ७ दिवसांत एकही कोरोनाबाधित नाही. त्यामुळे राज्यातील या सर्व जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत”, असेही डॉ. हर्षवर्धन यावेळी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.