HW News Marathi
महाराष्ट्र

“त्यांना अक्कलेचे धडे मिळाले”, नाव न घेता नारायण राणेंचा अजित पवारांना टोला

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची आज (१३ जानेवारी) निवड झाली आहे. या बँकेत  बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले, “जिल्ह्यात मोठमोठी लोके आली. त्यांच्याबद्दल काय बोलयचे, ही लोके अक्कल सांगण्यासाठी आलेल्यांना अकलेचे धडे दाखवून दिले,” असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला आहे.

बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, अजित पवारांनी नाव न घेता राणेंच्या अकलेचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर राणेंनी पवारांवर पलटवार करत म्हटले, “बाबांनो फार विचार करून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत मतदान करा, संस्था उभ्या करायला डोके लागते. आणि संस्था अडचणीत आणायला डोके आणि अक्कल लागत नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, नारायण म्हणाले, बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा वारसा गद्दारीचा आहे, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली. या लोकांना पळवून लावले पाहिजे, बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.  यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी बँकेचे मावळते अध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव न घेता टीका केली. त्यांचा वारसा गद्दारीचा आहे, अशा लोकांना आपण पळवून लावले आहे. त्यामुळे याचा लपूनछपून फिरण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. तो एक अपशकून होता, असे सांगत त्यांनी येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी गोरगरीब लोकांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणावर अन्याय करणाऱ्यांची राख करु

News Desk

भाजप सरकारला चले जाव सांगण्याची हीच योग्य वेळः खा. अशोक चव्हाण

News Desk

ठाकरे घराणं पुन्हा आमने सामने, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल

News Desk