HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात सत्तेसाठी केलेली युती महाराष्ट्राला पटणारी नाही !

नागपूर | भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्हापरिषद निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतली. यासभेदरम्यान गडकरींनी शिवसेवर तोफ डागली. गडकरी म्हणाले की, “‘राज्यात सत्तेसाठी केलेली युती महाराष्ट्राला पटणारी नाही. जनतेत नाराजी आहे. ही युती जनतेला पसंत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपला निवडून द्या’ असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवसेना ही काँग्रेसच्या रंगात रंगली आहे, असेही गडकरी म्हणाले.

यावेळी शिवसेनेने केवळ मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:च्या विचारधारेशी तडजोड केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात केवळ सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. गडकरींनी शिवसेनेवरही हल्ला चढवला. ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम्हाला (भाजप) १०५ जागा मिळाल्या. शिवसेनेसोबत युती होती, मात्र शिवसेनेने विश्वासघात केला. सत्ता मिळविण्यासाठी एकमेकांना न पाहाणारे गळ्यात गळा घालून फिरत आहेत’ अशी टीका नितीन गडकरी यांनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक चव्हाणांशी संबंधित साखर कारखाने आयकर विभागाच्या रडारवर

News Desk

जगाला गुड बाय करण्याची वेळ आली, सचिन वाझेंच्या धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने उडाली खळबळ

News Desk

“काहीही करा, मदत केल्याशिवाय जाऊ नका” चिपळूणच्या महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांजवळ हंबरडा…!

News Desk