बीड। राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. बीडमधील आंदोलनाचा आजचा 24 वा दिवस आहे. सरकारकडून विलीनीकरणावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने संपकरी संतप्त झाले आहेत. आमच्यावर दया करा अशी विनवणी करीत बीडच्या महिला वाहकांनी आंदोलनस्थळीच भाकरी थापून अनोखे आंदोलन केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यात वातावरण चांगलच तापलं आहे. मात्र आता या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट पडलेली पहायला मिळत आहे. राज्य सरकारनं पगारवाढ करून संप मागे घेण्याचं आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना केलं होती. त्यावर तोडगा म्हणून सरकारडून 41 टक्क्यांची ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. त्यानंतर काही कर्मचारी संप मागे घेत कामावर रूजु झाले आणि बऱ्याच दिवसांच्या संपानंतर लालपरी पुन्हा रस्त्यावर दिसू लागली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. मात्र काही कर्मचाऱ्यांनी विलीकरणावर ठाम राहत अजून संप सुरू ठेवला आहे. त्यामुळे संपात एकात्मता दिसत नाहीये.
दगडफेकीच्या घटना आता अनेक ठिकाणी
तर या संपामुळे आता संपूर्ण वातावरण हे तणावाच झालं आहे. यामुळेच नगरमध्ये पैठण, श्रीरामपूर आणि नगरकडे जाणाऱ्या बसेसवर मोठी दगडफेक झाली आहे. यावरून राजकारण तापलं आहे. कोणत्याही महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसतं. भाजप आंदोलकांना भडकवत आहे. अशी टीका राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तर भाजपकडूनही सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानं या दगडफेकीच्या घटना आता अनेक ठिकाणी झालेल्या पहायला मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.