HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी भाषा दिनानिमित्त रमेश देव, लता मंगेशकरांना अनोखी स्वरवंदना

मुंबई | मराठी भाषा दिना निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता वांद्रे पश्चिम रंगशारदा सभागृह येथे भाजपा नेते व आमदार आशिष शेलार यांच्यातर्फे मराठी भाषेतील रत्नांचे स्मरण करीत त्यांच्या कविता आणि गाणी यांची एक सुरेख संगीतमय मैफल अर्थात ‘मन मराठी स्वर मराठी’ आयोजित करण्यात आली आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांची मराठी गाणी या सोबतच भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने पंडितजींचे अजरामर अभंग त्यांचे शिष्य पंडित उपेंद्र भट सादर करणार आहोत. तसेच कुसुमाग्रजांसह कवयित्री शांताबाई शेळके, कवी वसंत बापट आणि शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांच्या कविता आणि गाणी यावेळी सादर करुन त्यांचे स्मरण करण्यात येणार आहे. याशिवाय दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्यावर चित्रीत झालेली गाणी सादर करुन त्यांच्याही आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.

मराठी भाषेला आपल्या प्रतिभेने श्रीमंत करणाऱ्या या रत्नांचे स्मरण या कार्यक्रमात करण्यात येणार असून प्रसाद महाडकर यांची संकल्पना असून दरवर्षी आमदार आशिष शेलार मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अशाच कल्पक कार्यक्रमाचे आयोजन करतात. जीवनगाणी तर्फे सादर होणाऱ्या या कार्यक्रमात अभिनेते तुषार दळवी, अभिनेत्री मधुरा वेलणकर काव्यवाचन करणार असून गायिका केतकी भावे -जोशी, राधिका नांदे, गायक दत्तात्रय मेस्त्री, मंदार आपटे आणि पंडित उपेंद्र भट यादी कलावंत सहभागी होणार असून स्मिता गवाणकर निवेदन करणार आहेत.

दरम्यान, कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मोफत प्रवेशिका आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध असल्याचे वांद्रे पश्चिम विधानसभा भाजपा अध्यक्ष किशोर पुनवत यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेची तिसरी यादी, बाळा नांदगावकर यांना उमेदवारीच नाही

News Desk

भाजपची या ‘चिमण्यांनो परत फिरा’ची साद, आमदार बाळासाहेब सानप  प्रतिसाद देणार?

News Desk

युतीबाबत आम्ही आशावादी, शिवसेना-भाजप नैसर्गिक मित्र आहोत !

News Desk