औरंगाबाद | कन्नडचे अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काल (१६ ऑक्टोबर) अज्ञता व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. जाधव यांच्या घरी काल मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हल्ला झाला. तसेच जाधव यांच्या गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जाधव यांची जीभ घसरली होती. त्याच पार्श्वभूमीवर जाधव यांच्या घरावर झालेला हल्ला हा शिवसैनिकांनी केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
कन्नड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी चिंचोली लिंबाजी येथील सभेत बोलताना जाधव यांनी उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान केले. जाधवांच्या त्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट होती.
उद्धव ठाकरेंनी जाधववर केलेली टीका
जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाल्याचे मानले जाते. कन्नडमधील एक विश्वासघातकी, ज्याने भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली होती, त्याला आता अजिबात माफी नाही. चुकतोय, लहान म्हणून मी चुका पोटात घालत होतो. पण, भगव्याशी हरामखोरी मी सहन करू शकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जाधव यांच्यावर जहरी टीका केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.