HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सरकारने दिलेल्या आदेशांचे खासदार उन्मेष पाटलांचे उल्लंघन

जळगाव | कोरोना विषाणूचा सर्वत्र धुमाकूळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यादृष्टीने गर्दी टाळण्याचे आवाहन देखील केले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सरकारने दिलेल्या आदेशांचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आज (२१ मार्च) दुपारी महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक, महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावरून खासदार महोदय तसेच इतर लोकप्रतिनिधी कोरोनाविषयी बेफिकीर असल्याचे दिसून आले.

या बैठकीला खासदार उन्मेष पाटलांसोबत आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा बारी, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, विविध योजनांची कामे करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. दीर्घकाळ ही बैठक चालली. खासदार उन्मेष पाटलांनी यावेळी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणारी अमृत पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजनेच्या कामाचा आढावा घेतला. खासदारांनी घेतलेल्या आढावा बैठकीविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता. बैठकीसाठी सर्व नगरसेवक तसेच अधिकारी वेळेवर उपस्थित होते. मात्र, खासदार पाटील हे तब्बल तासभर उशिराने बैठकीसाठी महापालिकेत दाखल झाले. त्यावरूनही अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

पंकजा मुंडे दोन दिवस मध्यप्रदेशात; भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थिती

News Desk

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

News Desk