पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. तसेच, शाळा-कॉलेजच्या सर्व परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याच्या शाले य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे काही शाळांकडून पालकांकडे शाळा सुरु होण्याआधीच शुल्काची मागणी करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश देत कठोर पावले उचलली आहेत.
पालकांकडे पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने कोणतीही फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षणमंत्र्यांनी शाळांना दिल्या आहेत. लॉकडाऊन असूनही अनेक शाळांनी पालकांना फी भरण्यास सांगितले होते. परंतू पालकांनी दक्षता दाखवत यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली. त्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय देत लॉकडाऊन काळात पालकांकडून फी न आकारण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत.
दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधीच शालेय पोषण आहार योजनेतंर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण करणेबाबतही आदेश दिले आहेत. त्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली होती.
शासन निर्णय प्रत :
शालेय पोषण आहार योजनेतंर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ , डाळी, कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण करणेबाबत . #Maharashtra #School #Students #Kids #Corona #Crisis #Outbreak pic.twitter.com/ShL7W9sixB— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 28, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.