HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार हे महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ,ऊर्मिला मातोडकरांकडून शुभेच्छा!

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे,त्यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनीसुद्धा पवारांच कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पवार साहेब हे महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून या वयात सुद्धा तरुणांना लाजवणारी त्यांची कार्यपद्धती आहे ज्याप्रमाणे पवार साहेब महाराष्ट्र आणि देशाला समोर नेत आहे ती अभिमानाची गोष्ट आहे’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.

उर्मिला पुढे म्हणाल्या , माझ्यासाठी आजचा दिवस मोठा भाग्याचे आहे की प्रत्यक्षात पवार साहेबांना शुभेच्छा देऊ शकले. माझ्यासारखा युवकांना पवार साहेबांकडून खूप काही शिकायला मिळत आहे राजकारण ,क्रीडा , समाजकारण या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे पवार साहेबांनी महाराष्ट्राला पुढे नेले आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे असे वक्तव्य शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या ऊर्मिला मातोडकर यांनी व्यक्त केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा  लवकर उपलब्ध कराव्या! – देवेंद्र फडणवीस

Aprna

भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही !

News Desk

महाराष्ट्रातील  निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ – महेश तपासे

News Desk