HW News Marathi
Covid-19

कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांची काळजी करण्याचे नाटक करु नका !

मुंबई | आपल्या कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्याबद्दल काळजी करण्याचे नाटक करु नका, असा टोला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लागवला आहे. लॉकडाऊननंतर अकडलेल्या स्थलांतरित मंजुरांवर सध्या राज्याचे राजकारण तापलेले दित्र दिसून येत आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत महाविकासआघाडीवर हल्लाबोल केला आहे.

योगी आदित्यनाथ ट्वीटमध्ये म्हणाले, “आपल्या घरी पोहोचलेल्या सर्व बंधू-भगिनींची उत्तर प्रदेशात काळजी घेतली जाईल. आपल्या कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्याबद्दल काळजी करण्याचे नाटक करु नका. सर्व कामगारांना विश्वास आहे की आता त्यांची जन्मभूमी त्यांची काळजी घेईल, शिवसेना आणि कॉंग्रेस निर्धास्त रहा” असे म्हटले

 

आपल्या रक्ताचे पाणी करुन महाराष्ट्राला मदत करणाऱ्या कामगारांचा शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला. लॉकडाऊनमध्ये त्यांना फसवले असून त्यांना वाईट अवस्थेत सोडून दिले, असा आरोप उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी योगी आदित्यनाथ यांनी महाविकासआघाडीवर केला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मंजुरांची झालेल्या अवस्थेवरू त्यांनी ट्वीट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

योगी आदित्यनाथ ऐवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. “संजय राऊतजी, भुकेलेला मुले ही फक्त आपल्या आईला शोधतो. महाराष्ट्र सरकारने अगदी ‘सावत्र आई’ म्हणून पाठिंबा दर्शवला असता, तरी महाराष्ट्राला हातभार लावणाऱ्या उत्तर प्रदेशच्या रहिवाशांना मूळगावी परत यावे लागले नसते.” असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

फक्त एक विनंती, ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी !

‘या’ कारणामुळे पियुष गोयल चिडले मुख्यमंत्र्यांवर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

News Desk

मुंबईतील नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स

News Desk

कोरोनाचा कहर! आता घरातही मास्क घालायची आली वेळ, केंद्राचा गंभीर इशारा

News Desk