मुंबई । उत्तर प्रदेशमधील हासरथ येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. देशभरातील सर्वच स्तरांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तर उत्तर प्रदेशचे योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांची एकंदर भूमिका आणखीच संशयास्पद आहेत. महाराष्ट्रातूनही या घटनेनंतर तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज (१ ऑक्टोबर) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना असे म्हटले आहे की, “उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण करणारे आहे. पण त्याहूनही अधिक भीषण प्रकार म्हणजे मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणे. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
#HathrasHorror #संतापजनक pic.twitter.com/qfPZtOlIBH
— Raj Thackeray (@RajThackeray) October 1, 2020
तसेच पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीबाबतही राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. “बरं, समजा त्या पिडीत मुलीच्या घरच्यांनी कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे ? त्यांना धक्काबुक्की का केली जाते ? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे ?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरे काय म्हणतात ?
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.