HW News Marathi
Covid-19

आमदार सुनिल शेळकेंची चिठ्ठी असेल तरच मिळणार लस ! मावळमध्ये अजब प्रकार  

मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती सध्या काहीहीशी नियंत्रणात आली आहे. मात्र, अद्यापही राज्यसमोरचे कोरोना संकटाचे आव्हान कायम आहे. तर दुसरीकडे उपलब्धतेनुसार लसीकरण कार्यक्रमही राबवला जात आहे. दरम्यान, आता मावळ तालुक्यात कोविडच्या लसीकरणाबाबत अजब प्रकार समोर आल्याचे वृत्त आहे. राज्यात सर्वत्रच लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यांमुळे नागरीकांची गैरसोय होतेय. मात्र, मावळमध्ये तर राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळकेंच्या चिठ्ठीशिवाय लसीकरण होतच नसल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

आमदाराची चिठ्ठीच ठरतेय लसीकरणासाठीची नोंदणी ?

मावळमध्ये अनेक लसीकरण केंद्रांवर राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळकेंच्या चिठ्ठीशिवाय लसीकरण होतच नाही. त्याचसोबत, आमदारांची चिठ्ठी दाखवली कि मात्र नोंदणी केलेली नसतानाही लगेच नोंद करुन लस दिली जात असल्याचा प्रकार समोर येतो आहे. आमदाराच्या एका चिठ्ठीवरच लस मिळणार असेल किंवा आमदाराची चिठ्ठी हीच लसीकरणासाठीची नोंदणी ठरत असेल किंवा मग लसीकरणाच्या नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या कोविन अँपची गरज काय ? असा सवालच इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. हा सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता या प्रकारानंतर सर्वस्तरातून येत आहे.

आरोपानंतर सुनील शेळकेंकडून सारवासारव

स्थानिक आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या नावाची फ्रंटलाईन वर्कर अशी नोंदणी करून त्यांचे अनधिकृतपणे लसीकरण करून घेत असल्याचा आरोपही इथल्या स्थानिकांकडून होत आहे. तर यव आरोपानंतर आमदार सुनील शेळके यांनी आता यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी आमच्या कार्यकर्त्यांकडून अशी चिट्ठी देण्यात येते”, असे स्पष्टीकरण आमदार सुनील शेळके यांच्या कार्यालयाकडून देऊन या प्रकरणी सारवासारव करण्यात आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांची चिंता वाढली, महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १० वर

News Desk

लसीचे दोन्ही डोस घेऊनही ​​​​​​​केईएम रुग्णालयातील 29 वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

News Desk

चिंतेत मोठी भर ! राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आज ३१ हजारांच्या पार

News Desk