HW News Marathi
महाराष्ट्र

वर्नोन गाेन्सालवीस, अरुण फरेरा काेर्टात हजर

पुणे । माअाेवाद्यांशी संबंध असल्याच्या अाराेपावरुन नजरकैदेत असलेल्या वर्नोन गाेन्सालवीस यांना अंधेरीतून तर अरुण फरेरा यांना ठाण्यातून पुणे पोलिसांनी अटक केली होती. या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात अाल्याने पुणे पाेलिसांनी अटक केली होती. या दोघांनाही अाज पुण्यातील शिवाजीनगर काेर्टात हजर करण्यात अाले असून ,सुनावणीला सुरुवात झाली अाहे. शुक्रवारी विशेष न्यायाधीश के. ढी. वढणे यांनी दाेघांचा जामीनाचा अर्ज फेटाळून लावला हाेता.

जामीन फेटाळल्याप्रकरणी अाराेपींचे वकील सिद्धार्थ पाटील अाणि अॅड राहुल देशमुख यांनी या निकालाच्या विराेधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले हाेते. तसेच त्यांच्या नजरकैदेत एका अाठवड्याची वाढ करण्यात यावी, असा अर्ज केल्याची माहिती त्यांनी दिली हाेती. मात्र उच्च न्यायालयात जाण्याच्या अाधीच दाेघांनाही पुन्हा अटक करण्यात अाली अाहे. सुधा भारद्वाज यांना देखील अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस हरियाणात दाखल झाले आहेत. अाज काेर्टात काय सुनावणी हाेते, तसेच दाेन्ही अाराेपींचा जामीन मंजूर होणार की काेर्ट पाेलीस काेठडी सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.

नेमके प्रकरण काय ?

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसे पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. यापूर्वीही एल्गार परिषदेशी संबंधित सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. याबाबत कबीर कलामंचावर देखील पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केजमध्ये कमळ नाही, आष्टी-पाटोदा-शिरूरमध्ये सत्ता राखली, वडवणी हातची गेली मग नेमकं मिळवलं काय? – धनंजय मुंडेंचा सवाल

Aprna

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का? भाजपचा सेनेला सवाल 

News Desk

“आज बाळासाहबे असते तर म्हणाले असते…..”

News Desk