नवी दिल्ली | राज्यसबाहेत जो गोंधळ झाला त्यावर आता व्यंकय्या नायडू यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नायडू यांनी गुरुवारी मार्शलांची नियुक्तीवर अहवाल मागविला होता. यानंतर सायंकाळी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. तसेच मार्शलांकडूनही उत्तर मागविण्यात आले होते.
सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही माझ्या डोळ्यांसारखे
व्यंकय्या नायडू यांनी झालेल्या प्रकारावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेत घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व बाबींवर विचार करण्यात आला आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. माझ्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही माझ्या डोळ्यांसारखे आहेत. माझ्या नजरेत दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही डोळे असतील तरच योग्य पद्धतीने पाहता येईल, असे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.सभागृहाचे कामकाज योग्य रितीने चालावे ही दोन्ही बाजुंची जबाबदारी आहे. येथे बाहेरील राजकीय लढाया लढू नयेत, असे म्हटले आहेत.
Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu today asserted that the Opposition and Treasury benches in the House are like his two eyes and are equal for him.
(File pic) pic.twitter.com/FKSwt7Ik4J
— ANI (@ANI) August 13, 2021
पुरुष मार्शलांन महिला खासदारांनाही धक्काबुक्की
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यसभेत घडलेल्या प्रकाराविरोधात आरोप केले आहेत. राज्यसभेत जेवढे सदस्य नव्हते त्यापेक्षा जास्त संख्येने मार्शल हजर होते. पुरुष मार्शलांन महिला खासदारांनाही धक्काबुक्की केली. हे मार्शल संसदेतील नव्हते तर बाहेरील होते. यावर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधकांनी भेट घेतली होती. १० ऑगस्टपासूनच राज्यसभेत अधिक संख्येने सुरक्ष रक्षक तैनात केले होते, जे सामान्य कामकाजाच्या दिवशी कधीही तिथे नव्हते.
अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला
या आरोपानंतर आता व्यंकय्या नायडू यांनी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. संसदेच्या स्टाफने यावर खुलासा पाठविला आहे. 10 ऑगस्टला कोणत्याही बाहेरील व्यक्तीला मार्शल म्हणून तैनात करण्यात आले नव्हते. लोकसभेत आणि राज्यसभेत फक्त लक्ष ठेवण्यासाठी आणि वॉर्ड स्टाफ असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्शल म्हणून तैनात केले होते. मार्शल किती असावेत किंवा ठेवावेत याची संख्या गरजेनुसार ठरविली जाते. हे मार्शल 14 ते 42 एवढ्या संख्येने असू शकतात. सर्वकाही कामकाजावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते, असे अहवालात म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.