मुंबई | ज्येष्ठ अभिनेत्या सुरेख शिखरि यांचं आज (१६ जुलै) हृदय विकाराच्या झटक्यामुळे पडल्यामुळे निधन झालं आहे. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचं निधन झालं.
सुरेख शिखरि यांची कारकीर्द
सुरॆह शिखरि यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुरेखा यांनी आत्तापर्यंत नाटकं, मालिका, चित्रपट सर्वच क्षेत्रात काम केलं. १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटविश्वात पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना ‘तमस’ (१९८८), ‘मम्मो’ (१९९५) आणि ‘बधाई हो’ (२०१८) या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
शिखरि यांचे राष्ट्रीय पुरस्कार
प्रत्येकाला तो क्षण आठवतो जेव्हा अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘बधाई हो’ या चित्रपटातील दादीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या कारकीर्दीतील हा विशेष पुरस्कार घेण्यासाठी जेव्हा सुरेखा सिक्री व्हीलचेयरवर आल्या, तेव्हा लोक उभे राहिले आणि त्यांनी तिच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी टाळ्यांचा गडगडाट केला. हा क्षण सुरेखा यांच्यासाठी खूप खास होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.