HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना संधी

मुंबई | येत्या २१ मेला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. यासाठी आता कॉंग्रसनेही त्यांच्या पक्षाकडून उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून राजेश राठोड यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, प्रवीण दटके या ४ उमेदवारांची नावे काल (८ मे) भाजपकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत.

तर दुसरीकडे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे ही दोन मावे निश्चित झाली आहेत. आतापर्यंत भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेसने आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली असून अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसने नावे जाहिर केली नाही आहेत. मात्र, शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नऊ कोटी जनताच ठरविणार राज्याचे भविष्य, मतदानाला उत्साहात सुरुवात

News Desk

तुम्ही पण आंदोलनं आणि निदर्शनं करा, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

News Desk

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू!

News Desk