HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्याव तोडगा काढू विजय वडेट्टीवारांच आवाहन

नागपूर। राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा वाद पेटलाय या आंदोलनावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत रात्र काढली. निर्णय होत नाही तोवर मुंबई सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर निर्णय घेतला जाईल, असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलंय.

वडेट्टीवार यांची विरोधकांवर टीका

कर्मचाऱ्यांचा पगार हा कमी असल्यामुळे पगार वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र न्यायालयाच्या माध्यमातून संपावर ठोस मार्ग काढू अस विजय वडेट्टीवार म्हणाले.मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी संप मिटवावा. प्रवाशांना वेठीस धरणं योग्य नाही. हा संप मिटवण्यासाठी मार्ग काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु आहेत. मात्र अस असतांना दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप देखील मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. विरोध पक्ष प्रवाशांना वेठीस धरत आहेत. काही राजकीय पक्ष संप चिघळवू पाहत आहेत. भाजप सत्तेत होता तेव्हा एसटीचं विलिनीकरण होत नाही असं सांगत होते. आताच तेच भाजप नेते एसटीच्या विलिनीकरणाची मागणी करत असल्याची टीका देखील राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांवर केली आहे.

मुनगंटीवार यांना आव्हान

उत्तर महाराष्ट्रात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. आम्हाला काही एसटी बंद ठेवण्यात किंवा खाजगी बसेसना स्टँडवर आणण्यात रस नाही. एसटी कामगार राजकारणाचे बळी ठरत आहेत. आज त्यांची भाषा पाहिली तर संप चिघळवण्याचे काम ते करत आहेत, असं सांगतानाच त्यांच्या काळात एसटीचं विलनीकरण का केलं नाही असा सवाल देखील अनिल परब यांनी ठासून केलाय. त्यावेळी राज्याची आणि एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. आज जे मागणीसाठी जोरजोरात बोलत होते त्यांचं तर सरकार तेव्हा होतं. केंद्रातही त्यांचंच सरकार होतं. तेव्हा त्यांनी एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच आज थातूरमातूर उत्तर देणाऱ्यांनी पूर्ण व्हिडीओ दाखवावाच, असं आव्हान विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा जो व्हिडिओ व्हायरल होतो त्यावरून दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्थिक संकट लक्षात घेता, येत्या काळात वैयक्तिक जीवनात काटकसरीने काम करा !

swarit

नागपूरात भीम आर्मीच्या मेळाव्याला कठोर अटींसह परवानगी

swarit

नागपूर विभागातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – मंत्री सुनील केदार

Aprna