मुंबई | गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. MPSC च्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावरुन महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, यांच्यापाठोपाठ कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही आता ट्विट करत या निर्णयाचा निषेध केला आहे. “परिक्षा रद्द करण्यामागे कोरोनाचे कारण आहेच कारण कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेच. पण यात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे तेल घालण्याचे काम करत आहेत. त्यांनी ज्या भाषेत वक्तव्य केलं आहे की, मराठा समाजावर अन्याय होत आहे ते चुकीचं आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी असं म्हटलं आहे की, SEBC च्या आरक्षित जागा बाजूला ठेवून इतर जागा भरण्यास हरकत नाही. हीच भावना इतर तरुणांचीही आहे. गेले अनेक वर्ष ही मुले पुण्यात राहून अभ्यास करत आहेत, त्यांचे आई वजील घाम गाळून कष्ट करत आहेत. रिक्षा चालकांची, कामगारांची मुलं पुण्यात येऊन शिकत आहेत. पण या मुलांना गृहीत धरलं जात आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, या विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या. आणि काहीतरी मार्ग काढा”, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने MPSC परीक्षेबाबत आज घेतलेल्या निर्णयाला पुन्हा वेगाने वाढत असलेले कोरोना संकट कारणीभूत आहे .
राज्यातील भाजप नेत्यांनी या संकटात तेल घालून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू नये. (1/2) #MPSC #mpscexam @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews #Maharashtra pic.twitter.com/DtRvT3V684— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 11, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.