HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीने कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा

वर्धा । हिंगणघाट येथे २४ प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळून ठार मारणारा आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याने बुधवारी (१९ फेब्रुवारी) कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. आरोपी नगराळेंची आज (२० फेब्रुवारी) आरोपीची न्यायालयात सुनावणी होणार आहे.

आरोपी सध्या नागपूरच्या अंडासेलमध्ये असून थंडीपासून बचाव करण्यासाठी कारगृहातील प्रशासनाने आरोपींना ब्लँकेट देण्यात आले आहे. या ब्लँकेटच्या सह्याने आरोपी नगराळेंनी आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आला. त्याने वेळीच धाव घेत विकेशच्या गळ्याभोवतीचा फास ढिला केला. यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या आरोपी विक्कीची प्रकृती स्थिर असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची न्यायालयात पेशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाबद्दल माहिती

नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला पीडित तरुणी हिंगणघाट शहरात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकवरून जात होती. यावेळी आरोपी विक्की नगराळे तिचा तिचा पाठलाग करत होता. आरोपीने पीडितेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती २० ते ३० टक्के भाजली. नागपूरच्या ऑरेज रुग्णालयात उपचारदम्यान पीडितेला सोमवारी (१० फेब्रुवारी) सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू झाला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”, तुषार भोसलेंची ठाकरे सरकारवर टीका

News Desk

“पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय”, फडणवीसांचा पवारांवर निशाणा

News Desk

“महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतोय” ,जयंत पाटील

News Desk