HW News Marathi
महाराष्ट्र

वांद्रे प्रकरणी उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबेला अटक

मुंबई | देशात कोरोनाचा वाढता धोका पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढवली आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे मुंबईतील परराज्यातील कामगार, मजूर यांनी गावी जाण्यासाठी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. या परराज्यातील मजुरांना चिथावणी देऊन वांद्रे येथे गर्दी जमवल्याचा आरोप असलेला उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

विनय दुबे याला ऐरोली येथून ताब्यात घेतले असून नवघर पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती नवी मुंबई परिमंडळ -१ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. विनय दुबे याच्यावर महारोगराई अधिनियम कलम ३ आणि आयपीसीच्या कलम ११७, १५३ ए, १८८, २६९, २७०,५०५(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याला आज (१५ एप्रिल) स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामा पोतरेंच्या कुटबियांना ५ लाखाचा धनादेश

News Desk

हेमंत नगराळे यांची  महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी

News Desk

“भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याआधी अधिकृतरित्या त्यांना दत्तक घ्या”, नागपूर खंडपीठाचा आदेश

Aprna