HW News Marathi
देश / विदेश

बाळासाहेबांचाच वारसा आहे सिद्ध करा, नाहीतर मुख्यमंत्रीपद खुर्ची सोडा !, मेटे आक्रमक

मुंबई | “प्रत्येकवेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या बाळासाहेबांचाच वारसा आपण चालवत आहोत हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध करावे. नाहीतर मुख्यमंत्रीपद सोडून द्यावे”, अशी बोचरी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. बीडमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान विनायक मेटे बोलत होते. यावेळी त्यांनी बीडसह शिरूर तालुक्यातील पौंडूळ, खांबा – लिंबा, खालापुरी या गावांची देखील पाहणी केली.अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेकडे विनायक मेटेंनी सरकारचे लक्ष वेधताना मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर घराबाहेर न पडण्याबाबत टीका होत असतानाच आता विनायक मेटेंनी निशाणा साधला आहे. “मुंबई सोडून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावे. नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा वारसा उद्धव ठाकरेंनी सिद्ध करावा. अन्यथा आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी”, अशी मागणी यावेळी विनायक मेटे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी देखील यावेळी विनायक मेटेंनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी दौऱ्याना सुरुवात झाली आहे. शरद पवार आजपासून मराठवाड्याचा २ दिवसीय दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उद्यापासून बारामतीतून आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. अशा स्थिती खुद्द मुख्यमंत्री मात्र घराबाहेर पडत नसल्याने मोठी टीका होत होती. मात्र, आता मुख्यमंत्रीही सोमवारी (१७ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला धक्का, सुप्रीम काेर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली

News Desk

मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा करणे आरोग्याला घातक

News Desk

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजप नेत्याची आणीबाणीची पोस्टरबाजी

News Desk