HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडे चुकीचा निर्णय घेणार नाही’, विनायक मेटेंचा विश्वास

नांदेड | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या विषयी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या कि ‘ आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, निवडून आलेल्यांना आम्ही शुभेच्छा देतो’, मात्र अद्यापही प्रीतम मुंडे कुठेही समोर आलेल्या नाहीत. या नंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त असून ७७ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राजीनामा सत्र नाट्य

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामे द्यावे, ते स्वीकारले तरी जातील अशी प्रतिक्रिया देत विनायक मेटे यांनी राजीनामा सत्र नाट्य असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. इतकंच नाहीतर पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेणार नाही असंही विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. ‘भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले. याची जाणीव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनापण आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटतं नसल्याचे’ आमदार मेटे म्हणाले आहे.

७७ पदाधिकारी मुंबईला रवाना

खासदार पंकजा मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने ७७ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बीड मधल्या ७७ पदाधिकारी आता मुंबईला रवाना झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्या (१३ जुलै) पंकजा मुंडे या बैठक घेत पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत पंकजा मुंडे समर्थकांना काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेच्या ५ जागांचा निकाल जाहिर

News Desk

‘मुंबईतल्या करी रोड दुर्घटतनेतल्या दोषींवर कारवाई होणार’ – किशोरी पेडणेकर

News Desk

मराठा मोर्चाचे दुसरे पर्व

News Desk