HW News Marathi
महाराष्ट्र

शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्यायला पंकजा मुंडेंना शिवसेनेत जावं लागेल -विनायक मेटे

पुणे | शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी एच.डबल्यू मराठीशी बोलताना पंकजा मुंडेंवर जोरदार टाका केली आहे . केवळ आक्रमकपणे बोलून काही होत नाही, तशी कृती करावी लागते असं म्हणतं त्यांनी पंकजा मुंडेंना सुनावले.

“पंकजा मुंडे यांनी काय करावे आणि काय नाही करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आक्रमकपणा हा कामातून दिसला पाहिजे बोलण्यातून नाही. कारण आम्ही बीडमध्ये पाहतो की, धनंजय मुंडे ८ दिवसांनी बीडमध्ये येतात. मात्र, पंकजा मुंडे वर्षाने आल्या आहेत. त्यामुळे जे उपस्थित आहेत त्यांच्याकडेच लोकं जातात. त्यामुळे बोलून काही होत नाही काम करुन त्याचा उपयोग होतो” असा सल्ला विनायक मेटेंनी पंकजा मुंडेंना दिला आहे.

तर दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी काल दसऱ्याच्या निमित्ताने भाषण केले त्यात असे म्हटले की पुढचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा प्रयत्न करु. यावर विनायक मेटे म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे जशी शिवसेना स्थापन झाली. तेव्हापासून त्यांचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतो. जर पंकजा मुंडेंना पुढचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घ्यावा वाटत असेल तर एकतर त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून घ्यावा लागेल किंवा पाहूणे म्हणून जावं लागेल किंवा त्यांना शिवसेनेत प्रवेश करावा लागेल. असं केलं तरच दसऱ्याच्या दिवशी त्या मेळावा घेऊ शकतील. त्यामुळे विनायक मेटेंनी सुचकपणे पंकजा मुंडेंना शिवतीर्थावर भाषण करायचे असेल तर शिवसेनेत प्रवेश करावा लागेल”, असे सुचवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेच्या टीकेला बहीण प्रीतम मुंडेंच सडेतोड प्रतिउत्तर!

Aprna

शरद पवार सर्वोच्च नेते, त्यांची कोणाला ॲलर्जी असण्याचं कारण नाही – छगन भुजबळ

News Desk

वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल, थोड्याच वेळात पोहरादेवीसाठी रवाना होणार

News Desk