HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर ? शिवतीर्थाच्या उल्लेखानंतर कार्यकर्त्यांचाही उस्फूर्त प्रतिसाद

विजयादशमीच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी (२५ ऑक्टोबर) ‘आपला दसरा’ या कार्यक्रमामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान भक्तीगडावर आपल्या समर्थकांना संबोधित केले. पंकजा मुंडे यावेळी नेमक्या काय बोलणार ? याकडे सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, पंकजांनी केलेल्या या भाषणात अनेक सूचक इशारे आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. हे महत्त्वाचे मुद्दे कोणते ? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

यंदाच्या विधानसभेतील दारुण पराभवानंतर पंकजा मुंडे पक्षावर प्रचंड नाराज होत्या. पुढे राज्यसभेची उमेदवारी असो वा राज्याची कार्यकारणी पंकजांना वारंवार डावलण्यात आल्याने पंकजांची नाराजी वाढल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या. मात्र, एकनाथ खडसेंप्रमाणे कधीही पंकजांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली नाही. आता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणीत मोठी जबाबदारी मिळाल्याने पंकजांची नाराजी दूर झाल्याचे म्हटलं जातं असलं तरीही खरंच असं आहे का ? हे जाणून घेणे महत्त्वाचं ठरतं. पंकजांचं यंदाचं दसरा मेळाव्याचं भाषण म्हणून सूचक ठरतं.

#PankajaMunde #UddhavThackeray #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #ChandrakantPatil #EknathKhadse #SharadPawar #NCP #ArjunKhotkar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Acid ची धमकी देत निकटवर्तीयाकडून वर्षभर तरुणीवर बलात्कार; Chembur मधील धक्कादायक प्रकार

News Desk

जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणात आणखी 2 जण ताब्यात

Manasi Devkar

राजकारणातील कटुता कमी करण्याचे प्रयत्न सुरू?

Seema Adhe